महत्वाच्या बातम्या
-
मुंबई आणि उपनगरामध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफान पावसाने मुंबई शहराला रात्रभर अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
MIDC पोलीस स्टेशन: डान्सबार कारवाईत पोलीस आयुक्तांकडून भेदभाव; पोलीस दलात तीव्र नाराजी
मुंबई शहरात अवैध्यरित्या सुरु असलेल्या डान्सबार’वरील पोलीस कारवाई पाठोपाठ त्या स्थानिक ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या निलंबनाच्या कठोर कारवाईमुळे सध्या मुंबई शहर पोलिसांमध्ये दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी (MIDC Police Station) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईट लव्हर्स बारवरील कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांची केवळ परिवहन प्रादेशिक विभाग कंट्रोल रूम येथे तात्पुरत्या स्वरूपात बदली करून थेट प्रकरण दडपण्याच्या हेतूनेच ती प्रेरित असलायचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सायनमध्ये पाणी तुंबलं नसून केवळ साचलं आहे
मागील काही दिवसांपासून उसंत घेणारा वरुणराजा काल रात्री पासून मुंबईमध्ये पुन्हा जोरदारपणे दाखल झाला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कार्यालयांकडे निघालेल्या मुंबईकरांना अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सकाळपासून ट्रॅफिकमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी आणि विशेष करून सखल भागात पाणी साचल्याने स्थानिक लोकांना देखील अनेक अडचणी येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
डोंगरी दुर्घटना: महापौरांच्या भेटीदरम्यान स्थानिकांचा रोष
मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी दुर्घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण आज मुंबईच्या डोंगरी तेथे कौसरबाग इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पाऊस नसला तरी अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होतं आहेत. घटनास्थळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना स्थानिकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. आता या घटनेला कोण जबाबदार असा जाब स्थानिकांनी महापौरांना विचारात संताप व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
महापौरांची गाडी 'नो पार्किंग'मध्ये पार्क; अन पालिकेची सामांन्यांकडून १० हजार वसुली
मुंबईमध्ये नो पार्किंगच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दंड आकारले जात असून सामान्य वाहन मालकांमध्ये पालिकेविषयी संतप्त भावना आहेत. मात्र मुंबई शहराचे प्रथम नागरिक स्वतः पार्किंगचे नियम पायदळी तुडवत आहेत असंच म्हणावं लागेल. मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या महापौरांवर कोणताही दंड आकारण्यात आला नसून, नियम केवळ सामान्यांसाठी आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, सामान्य लोकांनी नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास तब्बल १० हजारांमध्ये दंड आकारले जात आहेत, जो सामान्यांना परवडणार देखील नाही.
6 वर्षांपूर्वी -
क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना ऐरोली नाक्यावर स्थलांतराची नोटीस; कोळी समाज सेनेवर संतप्त
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
अहो महापौर! मनपा कर्मचारी झाकणं उघडी ठेवून जातात; अन गर्दुल्ले ती किलोने विकतात: सविस्तर
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर कोणत्याही गंभीर विषयावर काहीही संदर्भहीन प्रतिक्रिया देणे सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई झालेल्या जोरदार पावसामूळे पूर्ण मुंबईत पाणी तुंबलेले होते, मात्र महापौरांनी तो दावा फेटाळत पाणी कोठेही तुंबले नसून केवळ काही ठिकाणी साचले आहे असे विधान केले होते. मात्र आता तर त्यांनी विषयाचं मूळ आणि वास्तव समजून न घेताच पुन्हा एका गंभीर विषयावर अकलेचे तारे तोडले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अवैध वाहन पार्किंग: अनधिकृत फेरीवाले मोकाट; तर वाहन मालकांवर नियमानुसार दरोडे
मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वतः जागेवरचं भाडं नाकारायचं; अन घरपोच सेवा देणाऱ्या 'उबेर-ओला' बंद करा अशी मागणी?
राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रवाशांचे हाल होणार! विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा उद्यापासून बेमुदत संप
राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिकेकडून बेकायदा पार्किंगवरून १०,००० दंड वसुलीला सुरुवात
मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक कचरा येतो, पण समुद्रकिनारी डंपरने 'डंप' केल्यासारखा चिखल आलाच कुठून?
एका बाजूला दादर-माहीम चौपाटीवरचा रोजचा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाला २०१८ मध्येच लघुनिविदा काढण्याची वेळ आली होती. समुद्रात टाकलेला कचरा भरतीच्या लाटांमधून पुन्हा किनारपट्टीवर येत असल्याने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. माहीम-दादरचा पाच किलोमीटरचा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी सर्वात कमी बोली लावणाऱया मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स यांना पुढील सहा वर्षांसाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार होते. या कंत्राटानुसार किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पावसाळय़ात दर दिवसाला ६५ हजार रुपये तर पावसाळय़ानंतरच्या दिवसांत दरदिवशी ३५ हजार रुपये देण्यात येणार होते. दरवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात येणार होती.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई: अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
शहरात रात्रीपासून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. दरम्यान सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरल्याने प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई, ठाण्यावर भीषण पाणीसंकट; केवळ २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या जलाशयांमध्ये केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस झाला नाही, तर भीषण पाणीसंकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी मुंबई आणि ठाण्यात पावसाचं आगमन झालेलं नसून, अजून देखील उन्हाच्या झळा पोहोचत असून उकडाच कायम आहे. परिणामी उरलेल्या पाण्याची बाष्पीभवनाने अजूनच घट होत आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक या पाणीबाणीने चिंतित आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पूर्वपदावर आलेली मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली
खडवलीजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.
6 वर्षांपूर्वी -
सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू तर 31 जखमी - मुंबईकरांचा जीव झाला स्वस्त
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडून असलेला पादचारी पूल गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास कोसळला आणि या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा हिमालया पादचारी पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी
नवीमुंबई सानपाडा येथे पालिकेच्या मराठी शाळेच्या शेजारी लोकवस्ती असलेल्या भागात अनोळखी बॅग सापडली आहे. याची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर संस्थानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर अनोळखी बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई - अनु कपूर यांची तनुश्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया
मुंबई – अनु कपूर यांची तनुश्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया
7 वर्षांपूर्वी -
परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे - मुंबई उच्च न्यायालय
परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे, मुंबई उच्च न्यायालयाने चिंता बोलून दाखवली. राज ठाकरेंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला स्वतंत्र रेल्वे बोर्ड असावा ही मागणी रास्त नाही का? आपले मत नोंदवा.
7 वर्षांपूर्वी -
R.J. मलिष्काने मुंबई महानगर पालिकेला दिले नवीन गाण्याचे गिफ्ट
R.J. मलिष्काने मुंबई महानगर पालिकेला दिले नवीन गाण्याचे गिफ्ट
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN