26 April 2024 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Sameer Wankhede | समीर वानखेडेंना अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस देणार | राज्य सरकारची हायकोर्टाला हमी

Sameer Wankhede

मुंबई, 28 ऑक्टोबर | वादात अडकलेले NCB अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे (Sameer Wankhede) यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाच्या निकालानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Sameer Wankhede. Mumbai High Court has given relief to NCB officer Sameer Wankhede, who is embroiled in controversy. Mumbai High Court has directed the state government to give notice to Sameer Wankhede three days before filing any FIR or arrest :

आम्ही कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही एजन्सीसमोर चौकशीसाठी हजर होण्यास तयार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून आमच्याविरोधात एक मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्या मोहिमेअंतर्गतच एफआयआर दाखल न करताच एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, अशी भूमिका समीर वानखेडे यांच्या वकिलाने हायकोर्टात मांडली. राज्य सरकारकडूनही आपली भूमिका मांडण्यात आली. सुमारे अर्धा तास चाललेल्या सुनावणीनंतर मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असली तरी राज्य सरकारनं त्याला उच्च न्यायालयात विरोध केला. समीर वानखेडे यांच्याविरोधात चार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मुंबई पोलिस अधिकारी त्याचा तपास करत आहेत, हा तपास सध्या अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. तूर्तास कुठेही गुन्हा नोंदवलेला नाही, त्यामुळे वानखेडे यांनी दाखल केलेली याचिका चुकीची आहे, अशी भूमिका राज्य सरकारकडून हायकोर्टात मांडण्यात आली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sameer Wankhede got relief from Mumbai High Court before Mumbai police action.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x