28 April 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

‘नाणार’ संदर्भात कितीही करार करा, प्रकल्प सुरु होणार नाही म्हणजे नाही: नारायण राणे

रत्नागिरी : नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.

मी स्वतः कोकणचा भूमिपूत्र आहे आणि मला कोकणी माणसाने अपार प्रेम दिले आहे जे मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे मी कोकणी जनतेच्या हितासाठी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे. जर वेळ पडली तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामाही फेकून देईन असा इशाराच नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे.

तसेच शिवसेना ही नाणार बाबतची भूमिका ही दुपट्टी असल्याचा आरोप सुद्धा नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. मी शिवसेनेसारख्या राजीनामे खिशात घेऊन फिरणार नाही आणि वेळ पडली तर माझ्या कोकणी जनतेच्या हितासाठी मी खासदारकीचा तडकाफडकी राजीनामाही देईन असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात नाणार रिफायनरीच्या प्रकल्पावरून कोकणातील वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x