महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन
काल दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
7 वर्षांपूर्वी -
नॉटिंगहॅम कसोटीवर भारत सुस्थितीत, इंग्लंडपुढे ५२१ धावांचं आवाहन
विराट कोहलीच्या शतकी खेळीने आणि चेतेश्वर पुजारा तसेच हार्दिक पांड्याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दुसरा डाव भारताने ३५२ धावांवर घोषित केला. भारतीय टीम सध्या सुस्थितीत असून विजयाची अशा आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज निवडणूक झाल्यास एनडीएला तब्बल १०८ जागांचं नुकसान होईल : सर्वे
आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने एक सर्व्हे केला आहे. साडे चार वर्षांनंतर युपीए आघाडीला दुपटीने जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला ५५ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८; महिला पैलवान विनेश फोगाटला सुवर्ण पदक
आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारतीय पैलवान उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहेत. काल पुरुष पैलवान बजरंग पुनियानं’ने सुवर्ण पदक पटकावून भारतासाठी सुवर्ण कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. तर आज महिला पैलवान विनेश फोगाटने सुवर्ण पदकावर नाव कोरल आहे.
7 वर्षांपूर्वी -
धक्का! शिरोमणी अकाली दलाचा भाजपशी काडीमोड, स्वतंत्र निवडणूक लढणार
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला पंजाबमधील मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार धक्का दिला आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका शिरोमणी अकाली दल (एसएडी) स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्वकाही आधार'शी जोडल्याने भारतावर ‘सिव्हील डेथ’च सावट : एडवर्ड स्नोडेन
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने भारतातील ‘आधार’ संबंधित केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे. भारत सरकारने UIDAI च्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली बनवली आहे. परंतु भारत सरकारच्या आधार’ला सर्वकाही जोडण्याच्या सक्तीमुळे भारताला ‘सिव्हिल डेथ’ म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका असल्याचं विधान केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
क्रिकेटपटू गौतम गंभीरची दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप'मध्ये फिल्डिंग?
भारतीय क्रिकेट टीम’मध्ये ओपनिंग करणारा गौतम गंभीर सध्या नवी खेळी करण्याच्या तयारीत असून, तो दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप’मध्ये फिल्डिंग लावत असल्याचे समजते. मागील अनेक दिवसांपासून तो क्रिकेटपासून दुरावला असून सध्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक बजरंग'कडून स्व. अटलजींना समर्पित
१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या बजरंग पुनियाने पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले आणि सुवर्ण पदकावर स्वतःच नाव कोरल आहे. बजरंग पुनियाने हे पहिले सुवर्णपदक स्व. अटलजींना समर्पित केल्याचे ट्विट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजीव गांधींची ४७वी जयंती; टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रात भारताला दिशा देणारे माजी पंतप्रधान
आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७४वी जयंती आहे. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन राजीव गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. देशातील टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रातील क्रांतीचे तेच खरे शिल्पकार होते.
7 वर्षांपूर्वी -
केरळ'साठी मदत निधीच्या नावाने पेटीएम'चे मालक विजय शेखर शर्मा यांचं नोटबंदीनंतर पुन्हा प्रोमोशन-ब्रॅण्डिंग
संपूर्ण केरळला पावसाने काही दिवस झोडपले असून सर्वत्र पुराचे साम्राज्य असून त्यात लाखो लोकं बेघर झाले आहेत तर शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. केरळला सर्वच थरातून मदत होत असताना त्यात केंद्र सरकार, अनेक राज्य सरकार आणि सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु असताना एक कटू अनुभव आल्याचे दृश्य आहे. कारण देशातील एका अब्जाधीशाने अशा संवेदनशील विषयात सुद्धा स्वतःच्या कंपनीचे प्रोमोशन आणि ब्रॅण्डिंग करत हात धुतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा हस्तक जबीर मोतीला लंडनमध्ये अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक जबीर मोती याला लंडन पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. स्थानिक माध्यमांकडून हाती येत असलेल्या माहितीनुसार जबीर मोती’च्या अटकेची भारताकडूनच मागणी करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
जो पक्ष २०१९ च्या निवडणुकीत बक्कळ पैसा खर्च करेल तोच पक्ष जिंकेल: कपिल सिब्बल
काल काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे नागपूर दौऱ्यावर आले असता ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाहीतील संघर्ष’ या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या परिसंवादात त्यांनी आगामी निवडणुकीच वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
7 वर्षांपूर्वी -
जे संकट केरळात आलं तेच संकट उद्या महाराष्ट्रावरही येऊ शकत? डॉ. माधव गाडगीळ
मागील काही दिवसांपासून केरळ मध्ये तुफान बरसणाऱ्या पावसाने संपूर्ण राज्यभर हाहाकार माजवला आहे. अगदी लष्कराची मदत सुद्धा अपुरी पडताना दिसत आहे. संपूर्ण देशातून मदतीचा ओघ सुरु असली तरी देखील मदत कार्यात अनेक अडथळे येत आहेत. परंतु केरळमध्ये झालेला जोरदार पाऊस नैसर्गिक असला, तरी यामुळे आलेला पूर मानव निर्मित आहे असं ठाम मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून पूरग्रस्त केरळसाठी ५०० कोटींची मदत जाहीर
केरळच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० कोटी रुपयांची आपत्कालीन मदत जाहीर केली आहे. केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१७-१८ आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा विक्रमी भरणा, तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सच्या भरणा विक्रमी म्हणजे तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला असून तो आज पर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे.
7 वर्षांपूर्वी -
माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन
भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सामान्यांपासून ते सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
7 वर्षांपूर्वी -
केरळमध्ये अति पावसामुळे जनजीवन विस्कळीत, मृतांची संख्या वाढली
केरळमध्ये काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून त्यात जवळपास ९७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तुफान बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे इडुक्की धरण पूर्ण भरले असून आता पाणी ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वर्गीय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रति त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली, अशी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
ते कधीच 'वाजपेयी सरकार' म्हणून जगले नाही, तर एनडीए'ची टीम म्हणूनच जगले
१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्याच काळात राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण जगाला म्हणजे अगदी अमेरिकेच्या सीआयए’ला सुद्धा त्या अणुचाचणीचा सुगावा लागला नव्हता. तो विषय अणुशास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम, स्वतः अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि भारतीय लष्कर अशा ‘टीम’ने नियोजन पद्धतीने हाताळला होता.
7 वर्षांपूर्वी -
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच निधन
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच आज नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. देशातील अनेक नेत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्लीकडे धाव घेतली आहे. संपूर्ण दिल्लीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN