महत्वाच्या बातम्या
-
खैरेंचा पराभव हा माझा पराभव; पण शिरूर व रायगडचा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख नाही
शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा मानहानीकारक पराभव झाला. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना दौऱ्यावर आलेले असताना दिली. मात्र शिरूर लोकसभा आणि रायगड लोकसभा मतदार संघातील अनुक्रमे शिवाजी आढळराव-पाटील आणि अनंत गीते यांच्या बद्दल कोणतेही भाष्य केले नाही. कारण हे दोन नेते देखील पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्ष संपली, विधानसभा आल्या; आता मुख्यमंत्र्यांकडून मराठवाडा दुष्काळमुक्तीची भाषा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा दौरे सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून आणि ३-४ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने त्यांच्याकडून पुन्हा मतदाराला आणि विशेष करून दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या मराठवाड्याला पुन्हा मृगजळ दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते म्हणाले ‘सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे, परंतु आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत
भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते स्वतःच निवडून येण्याची शास्वती नाही; त्यांच्या भरोसे स्वबळावर ही राजकीय आत्महत्या?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रापासून ते संपूर्ण देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार बैठका सुरु आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीला वगळून स्वबळावर किंवा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढवावी अशी मागणी पुढे आली आहे. मात्र काँग्रेसकडे आजच्या घडीला राज्य पातळीवरील चेहराच शिल्लक नसल्याने ते असं धाडस नेमकं कोणत्या आधारावर करत आहेत ते समजायला मार्ग नाही.
6 वर्षांपूर्वी -
उशीरच झाला! जमिनीवरील नेते शरद पवार आता डिजिटल तंत्राचा वापर करणार
मागील काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही समाज माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच विषयाला नुसरून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता शरद पवारां त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
१० वी चा यशाचा टक्का घसरला, फक्त ७७.१० टक्के विद्यार्थी पास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे २०१९ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाचा निकाल ८९.४१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जुन २०१९ रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत, तसेच याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलर वरून दिली आहे. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ नवनिर्वाचित खासदार देखील असतील. मात्र उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आधीच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी १ वादग्रस्त विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पहले सरकार, फिर मंदिर...उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाणार
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत फार काही अलबेल नव्हतं. उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी सतत भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसले, परंतु पुन्हा दिलजमाई करत दोघेही सोबतच निवडणूक लढले. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता आणि त्यावेळी “पेहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत भाजप विरुद्ध उघड-उघड रणशिंगच फुंकलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
वरळी की शिवडी विधानसभा? आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?
मागील काही दिवसांपासून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्ष ते अधिकृतपणे शिवसेनेमध्ये कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे. त्यासाठी वरळी किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यासाठी अंतर्गत चाचपणी सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'तो' निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वर्ग केले आहे असा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास लावून घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अब्दुल सत्तार भाजपात आल्यास औरंगाबाद भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता
काँग्रेसचे सिल्लोडमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यावरून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत हस्तक्षेप होण्याची शक्यता असून स्थानिक नेते मंडळी नक्की काय निर्णय होतो त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांनी सेनेला मतं दिली; आता सेना नेत्यांची मुलं मराठी उद्योजकांकडून खंडण्या मागत आहेत
लोकसभा निवडणुकीत मतदाराने भाजपसोबत शिवसेनेच्या खासदारांना देखील कोणताही कर्तृत्व नसताना भरभरून मतदान केलं. मात्र आता त्याच मतदारांकडून शिवसेनेच्या आमदारांची मुलं खंडण्या मागत असल्याचे समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले असे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव आहे. मुंबईतीली भांडुप येथील वाहतूक व्यावसायिक राजेश शेटकर यांच्याकडे महाड एमआयडीसीत व्यावसाय करण्यासाठी विकास गोगावले यांनी खंडणीसाठी राजेश यांना धमकावल्याचा आरोप आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत पाकिस्तानचं पाणी अडवण्याच्या धमक्या देऊन बारामतीचं पाणी बंद?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा दुर्लक्षित करून भाजपचे सर्वच नेते मंडळी भाषणात केवळ पाकिस्तानवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर भाषणात थेट पाकिस्तानचं पाणी रोखण्याची भाषा केली होती. भारतातुन वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे आज बहुमताने केंद्रात सत्तेत येताच पाकिस्तनाला विसरले असून, देशातील सामान्य लोकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे काम करत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची जाहिरात सार्वजनिक बँकां स्वतःच वर्तमानपत्रात देत आहेत
देशभर निरव मोदी आणि अनेक कर्जबुडव्या उद्योगपतींचे घोटाळे समोर असताना लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या नेत्यांची पोलखोल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची घोषणा थेट वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन करत आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते आणि त्यांची कृत्य सामान्यांसमोर उघड होत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळणे आमचा अधिकारच : संजय राऊत
लोकसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक विजयात बहुमताचा आकडा पार करत भारतीय जनता पक्षाचे ३०३ खासदार निवडणून आले, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आले. त्यामुळे एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा सर्वाधिक विजयी खासदार असलेला पक्ष ठरला. परंतु त्यांना केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ते देखील अवजड उद्योग खाते. यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या.
6 वर्षांपूर्वी -
जयघोषाने रायगड दुमदुमला! किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा
स्वराज्याची राजधानी रायगडात किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. यानिमित्ताने शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने रायगडावर हजेरी लावली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पहाटेच रायगडावर हजेरी लावून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. ते रोप वेने याठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे यंदा शेतकरी बांधवांना अभिषेकचा मान देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसाची हजेरी! वीज, टेलिफोन सेवा खंडित
कोकणाची आज पहाट झाली ती जोरदार पावसाने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हजेरीने सुखावलेल्या बळीराजाने पेरणीची कामेदेखील सुरू केली आहेत. परंतु पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणची वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल, विदर्भ-मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दूध महागलं! निवडणुकीत 'चाय पे चर्चा' संपताच सरकारने प्रति लिटर 3 रू अनुदान बंद केले
लोकसभा निवडणूक संपताच आणि केंद्रात बहुमताने मोदी सरकार पुन्हा विराजमान होताच, महागाईत आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. खाजगी आणि सहकारी दूध महासंघाची महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे नवे दर ८ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. सध्या गायीच्या दुधाचा दर ४२ रूपये प्रति लिटर असून तो आता ४४ रूपये प्रति लिटर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेत 'त्या' १५३ जागांवर मनसेला मोठी सुवर्णसंधी: प्रकाश आंबेडकर
आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH