8 May 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - मोड आलेल्या मटकीची उसळ / भाजी

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. घरगुती मोड आलेली मटकी बनवण्यासाठी सकाळी मठ पाण्यात भिजत घालावे
  2. मठ संध्याकाळ पर्यंत भिजतात
  3. मठ भिजल्यावर त्यातिल सर्व पाणी काढून टाकावे आणि मग मठ एका काॅटनच्या कापडात बांधून ठेवावे जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत छान मोड येतात
  4. मटकीची उसळ बनवण्यासाठी एका कढईत ३ – ४ चमचे तेल गरम करून घ्यावे त्यानंतर त्यात मोहरी घालावी
  5. मोहरी तडतडली की जिरं घालावं, नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतावे
  6. कडीपत्ता घालावा मग बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावा आणि त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित शिजेपर्यंत परतावे
  7. नंतर त्यात मसाले, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर सर्व मसाले घालावे आणि २ मिनिटे परतावे
  8. त्यानंतर त्यात मोड आलेली मटकी घालावी व व्यवस्थित परतून घ्यावी
  9. नंतर त्यात मटकी शिजण्यासाठी १/२ ग्लास पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून १० मिनिटे झाकन ठेऊन मटकी शिजवून घ्यावी
  10. मटकी शिजल्यावर वरून पुन्हा बारीक चिरलेला टोमॅटो व कोथिंबीर घालून मिक्स करावे
  11. मोड आलेली मटकीची उसळ/ भाजी खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • १ कप मोड आलेली मटकी ( 1 Cup sprouted Matki / Moth beans )
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो ( 1 Chopped Tomato)
  • १ बारीक चिरलेला कांदा ( 1 Chopped Onion )
  • बारीक चिरलेली कोथिंबीर ( Coriander leaves)
  • १/२ चमचा मोहरी ( 1/2 tsp Mustard seeds )
  • १/२ चमचा जिरे ( 1/2 tsp Cumin seeds )
  • १ चमचा गरम मसाला ( 1 tsp Garam Masala )
  • १ चमचा लाल तिखट ( 1 tsp Red chilly powder )
  • १/२ चमचा हळद ( 1/2 tsp Turmeric powder )
  • २ चमचे धने पूड ( 2 tsp Coriander powder )
  • १ चमचा आलं-लसुण पेस्ट ( 1 tsp Ginger-Garlic past )
  • मीठ चवीनुसार ( Salt to taste )

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x