26 April 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
x

तिहार जेलमध्ये चौकशीनंतर पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक

P Chidambaram, INX Media Case

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसंच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.

विशेष न्यायालयाने मंगळवारी ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच आवश्यकता असल्यास अटकेची परवानगी दिली होती. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते असेही सांगितले. तिहार जेलमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळण्याची मागणी चिदंबरम यांनी केली. अपमान करण्यासाठी सीबीआय मला तुरुंगात ठेवत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे. ‘चिदंबरम यांना ६० दिवस तुरुंगात ठेवण्याचे त्यांनी ठरवले आहे. सीबीआय कोठडीत असताना ईडी समोर हजर होण्याची त्यांची इच्छा आहे,’ असे चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले.

सीबीआयने चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून ते कोठडीत आहेत. याच प्रकरणात ‘ईडी’ला चिदंबरम यांची चौकशी करायची आहे. यूपीए सरकारमध्ये अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया कंपनीत परदेशी गुंतवणुकीसाठी परवानगी दिली होती. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याने त्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगामध्ये जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी ‘सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या भेटीमुळे मी धन्य झालो. काँग्रेस पक्ष समर्थ व शूरांचा पक्ष असून माझेही वर्तन तसेच राहणार आहे’ असं ट्वीट चिदंबरम यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले होते.

हॅशटॅग्स

#Congress(527)#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x