7 May 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार? Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग
x

मुंबईत एकाच दिवशी ७५१ नवीन रुग्ण; ५ जणांचा मृत्यू

Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, २ एप्रिल: मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखीच फुगत चालला आहे. आज एकाच दिवशी करोनाचे ७५१ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाले असून गेल्या २४ तासांत करोनामुळे ५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२५ इतकी झाली आहे.

तत्पूर्वी, लॉकडाउनमुळे कोराना विषाणूचा गुणाकार रोखण्यात यश आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात काही भागांत कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत. परंतु पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले, त्यांचे निकटवर्तीय यांचीदेखील तपासणी करत आहोत. त्यामुळे हे आकडे वाढल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे २२९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात नोंदवल्या गेलेल्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता पहिल्यांदाच हा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. भारताच्यादृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

 

News English Summary: The number of coronary heart disease patients in Mumbai is further inflated. Anxiety has been heightened by the discovery of 751 new patients in Corona on the same day today. At the same time, the death toll has dropped to five in the last 24 hours. The number of coronary heart disease patients in Mumbai has now reached 7,625.

News English Title: Story Corona virus in Mumbai 751 more test positive Covid 19 tally now 7625 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x