महत्वाच्या बातम्या
-
देशात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेणं शक्य नाही : मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत
आज स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केलं आहे. जर त्या एकत्र घ्यायच्या असतील तर ते कायदेमंडळाने ठरवले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पप्पू पुन्हा नापास झाला, मनसेकडून आमदार राम कदमां'च्या अभिनंदनाच पोश्टर
काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याचाच धागा पकडून मनसेने घाटकोपर पश्चिमेला आमदार राम कदम यांच अभिनंदन करणारा पोश्टर लावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अखेर पोर्टेबल पेट्रोल पंपाला पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी
अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय आज मार्गी लागला आहे. पेट्रोल पंप उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्या, पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी घेऊन सुद्धा त्यासाठी अनेक वर्ष – महिने वाट पाहावी लागते. परंतु आता पेट्रोलियम मंत्रालयाची पोर्टेबल पेट्रोल पंपाच्या तंत्रज्ञानाला मंजुरी दिल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले ? : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित जैन समाजातील लोकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा प्रश्न उपस्थित जैन समाजातील लोकांपुढे करून मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
7 वर्षांपूर्वी -
केरळच्या पूरग्रस्तांसाठी मनसेच्या अनेक शाखांमधून लोकसहभागातून मदत रवाना
रळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मागील ४ वर्ष विकास कामे ठप्प, भाजप आमदार आर. टी. देशमुखांना एनसीपी कार्यकर्त्यांकडून चोप
बीडचे माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना एनसीपी कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला. भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना अक्षरशः गाडीतून बाहेर खेचून मारहाण करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अनिल अंबानी समुहाकडून नोटीस
बहुचर्चित राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणारे काँग्रेस नेते तसेच काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना अनिल धीरुभाई अंबानी समुहाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूह सुद्धा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न विचारलं जाऊ लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आशुतोष यांच्या पाठोपाठ आशीष खेतान यांचा सुद्धा 'आप' पक्षाला रामराम
आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आशुतोष काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही दिवसातच आप’ला दुसरा धक्का बसला आहे. पक्षातील अजून एक मोठे नेते तसेच पत्रकार आशीष खेतान यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या विषयाचा संदर्भ धरून नरेंद्र मोदी तसेच भाजपवर सामना मुखपत्रातून निशाणा साधला आहे. आजच्या सामना संपादकीयमधून मोदी तसेच भाजपचा खरपूस समाचार घेताना विविध दाखले दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन
काल दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
7 वर्षांपूर्वी -
आज निवडणूक झाल्यास एनडीएला तब्बल १०८ जागांचं नुकसान होईल : सर्वे
आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने एक सर्व्हे केला आहे. साडे चार वर्षांनंतर युपीए आघाडीला दुपटीने जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला ५५ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
धक्का! शिरोमणी अकाली दलाचा भाजपशी काडीमोड, स्वतंत्र निवडणूक लढणार
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला पंजाबमधील मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार धक्का दिला आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका शिरोमणी अकाली दल (एसएडी) स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्वकाही आधार'शी जोडल्याने भारतावर ‘सिव्हील डेथ’च सावट : एडवर्ड स्नोडेन
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने भारतातील ‘आधार’ संबंधित केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे. भारत सरकारने UIDAI च्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली बनवली आहे. परंतु भारत सरकारच्या आधार’ला सर्वकाही जोडण्याच्या सक्तीमुळे भारताला ‘सिव्हिल डेथ’ म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका असल्याचं विधान केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
क्रिकेटपटू गौतम गंभीरची दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप'मध्ये फिल्डिंग?
भारतीय क्रिकेट टीम’मध्ये ओपनिंग करणारा गौतम गंभीर सध्या नवी खेळी करण्याच्या तयारीत असून, तो दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप’मध्ये फिल्डिंग लावत असल्याचे समजते. मागील अनेक दिवसांपासून तो क्रिकेटपासून दुरावला असून सध्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राजीव गांधींची ४७वी जयंती; टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रात भारताला दिशा देणारे माजी पंतप्रधान
आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७४वी जयंती आहे. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन राजीव गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. देशातील टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रातील क्रांतीचे तेच खरे शिल्पकार होते.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात ओंकारेश्वर पूलापासून ‘अंनिस’ची ‘जवाब दो’ रॅली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज तब्बल ५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु इतका काळ उलटून सुद्धा हत्येमागील सूत्रधार मोकाटच असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘अंनिस’ तर्फे ‘जवाब दो’ रॅली काढण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे महिला आघाडीच्या विधानसभा निहाय जोरदार बैठका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष विस्तार आणि विधानसभा निहाय बैठका मोठयाप्रमाणावर सुरु असून, त्याला महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ती मनसेसाठी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने जमेची बाजू असल्याचे लक्षात येते. सध्या मनसे सामान्य जनतेच्या संबंधित प्रश्नांना हात घालून लोकांपर्यंत पोहोचत आहेत, तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई गणेश मंडळांसाठी अमित ठाकरें व महाराष्ट्र सैनिक मैदानात; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबईतील आणि गिरगावातील गणेश मंडळांसाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आखाड्यात उतरले असून, त्यांनी गणेश मंडळांच्या व्यथा आणि प्रश्न घेऊन थेट मुख्यमंत्री निवास गाठलं आहे. अमित ठाकरे यांच्या बरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवास्थानी भेट घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला एटीएस'कडून अटक
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वेगाने सूत्र हलताना दिसत आहेत. नालासोपारा ते औरंगाबाद मधून आधीच काही संशयितांना अटक झाली असताना आता शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर वय ४१ वर्ष याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जालना येथून ताब्यात घेतले आहे.
7 वर्षांपूर्वी -
जो पक्ष २०१९ च्या निवडणुकीत बक्कळ पैसा खर्च करेल तोच पक्ष जिंकेल: कपिल सिब्बल
काल काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे नागपूर दौऱ्यावर आले असता ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाहीतील संघर्ष’ या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या परिसंवादात त्यांनी आगामी निवडणुकीच वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL