महत्वाच्या बातम्या
-
आता विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्णय घोषित करते वेळी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या या निर्णयाची आता खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे
समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेणगावच्या जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
शेणगावच्या अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपुरात सकाळी साडेतीनच्या सुमारास ही विठूरायाची ही शासकीय पूजा पार पडली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय
मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरवर्षी पंढरपुरात आषाढीची पूजा पार पडत असते आणि कायम चालत आलेली शासकीय प्रथा आहे.
7 वर्षांपूर्वी -
'आम्ही कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत', शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला?
आज नागपूर कोराडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचा संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला लगावला आहे. त्यापुढे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक मुद्यांवर अप्रत्यक्ष आणि बोचरी टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक
उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.
7 वर्षांपूर्वी -
सिडको जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांची न्यायालयीन चौकशीची घोषणा
अधिवेशनापूर्वी सिडको येथील जमीन व्यवहार प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिल. मुख्यमंत्र्यांनी काही स्पष्टीकरण देऊन थेट न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा आज अधिवेशनात केली.
7 वर्षांपूर्वी -
सिडको भूखंड घोटाळ्यावरुन शिवसेनेकडून मुख्यमंत्री लक्ष
सामना मुखपत्रात सिडको भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आल आहे. सामना अग्रलेखात देवेन्द्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवल्याचे कागदोपत्री दिसून येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वच्छ पारदर्शक कारभाराचे धडे देत एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी घरी बसवलं होत याची आठवण सुद्धा करून देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना गप्प, गुजरातचा महाराष्ट्राला तापी खोऱ्यातील हक्काचे पाणी देण्यास नकार
गुजरात राज्याने पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र पाठवून गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी द्यावे अशी विनंती केली होती. परंतु गुजरात सरकारने स्पष्ट नकार देत महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
दत्तक नाशिकमध्ये भाजपसाठी भविष्यात धोक्याची घंटा ?
सत्ताधारी भाजपचा सध्या जरी नाशिकमध्ये २ खासदार, ४ आमदार, महापालिकेत सत्ता, जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य अशी ताकद आहे. परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ती ताकद केवळ कागदावरच असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपची नाशिकमधील लॉबी खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावून आपल्याच उमेदवाराला धूळ चारत असल्याचे चित्र समोर आलं होत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने आपलाच उमेदवार पळवून आपल्याच विरुद्ध उभा केला
ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवून आपल्यासमोरच उभा केला. तरी आपण पोटनिवडणूक जिंकली, परंतु येत्या निवडणुकीत शिवसेनेपासून सावध राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य: फडणवीस
आम्ही यापुढे शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू परंतु त्याआधी शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य आहे हे पालघर लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणुकीत जनतेने शिवसेनेला नाकारलं
पालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पाहल्या ३-४ फेऱ्यामध्ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती तरी भाहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप फेरीपासूनच अग्रस्थनी होती.
7 वर्षांपूर्वी -
पालघर, भंडारा-गोंदिया निवडणुक मतदान, व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधून
आज पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक यंत्रणा सुसज्ज झाली असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. हे व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधील सुरत व बडोदा येथून आणण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही
शिवसेनेतील संजय राऊतांसारख्या व्यक्तीला भाजपने कधीही महत्त्व दिलेले नाही. त्यांना केवळ प्रसार माध्यमांनी मोठे केलं. पण आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ४ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! नाहीतर कोकणी माणूस कुणाचंही ऐकत नाही: शरद पवार
सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आधुनिक आणि भव्य हॉस्पिटलचे उद्धाटन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाणार प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष पणे सूचक इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बांदेकर! सिद्धिविनायकाचे अध्यक्ष असेपर्यंत तरी खरं दाखव: मुख्यमंत्री
सध्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेत एकमेकांवर जोरदार चिखलफेक होताना दिसत आहे. कालच प्रचारादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ टेप भर सभेत ऐकवली. परंतु त्याच ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते आदेश बांदेकरांनी वाचून दाखवलं होतं.
7 वर्षांपूर्वी -
पालघर प्रचारातील युतीचा कलगीतुरा अगदी २०१४ प्रमाणे?
सत्तेतीलच दोन वाटेकरी पक्ष पालघर निवडणुकीतील प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय काल शिवसेनेच्या प्रचारादरम्यान आला आहे. कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनीच वनगा परिवारास तोडल, ते पाप त्यांचं : मुख्यमंत्री
भाजपकडून श्रीनिवास वनगाला लोकसभेची उमेदवारी देण्याच निश्चित झाले होत. त्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं होत. परंतु नंतर त्यांनी वनगा परिवार तोडण्याचे पाप केलं आणि त्यांना भाजप विरुद्ध उमेदवारी सुद्धा दिली. त्यामुळे त्याचे फळ शिवसेनेला भोगावेच लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
पालघरच्या मूळ समस्या प्रचारातून बाजूला ?
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्थानिक मूळ विषयांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तीरांजली दिली असून प्रचाराचा सर्व रोख हा वैयक्तिक टीकेवर केंद्रित झाल्याचे चित्र आहे. नालासोपारा, वसई, विरार, बोईसर ते पालघर पट्यातील लोकांच्या मूळ समस्या ह्या प्रचारातून गायब झाल्या असून एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यातच सर्व पक्ष गुंतले आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA