7 May 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा
x

चिंता मिटली | परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत प्रवेश मिळेल

SSC Result

पुणे , ०९ जुलै | कोरोना लाटेमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे.

शालेय शिक्षण विभागानुसार, राज्याच्या ६ विभागांत २०२०-२१ मध्ये अकरावीच्या ५,५९,३४४ जागा होत्या. ४,४९,०५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. ३,७८,८६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर १,८०,४८३ म्हणजे ३२ %जागा रिक्त होत्या.

सर्वांना मिळेल प्रवेश : २०२०-२१ च्या दहावीच्या नियमित परीक्षेचा निकाल ९५.३० % लागला होता, तर अनुत्तीर्णांचे प्रमाण ४.७ % होते. पुरवणी परीक्षेत ७५.८६ % विद्यार्थी उत्तीर्ण तर २४.१४ % अनुत्तीर्ण झाले होते. या तुलनेेत अकरावीच्या ३२ % जागा रिक्त होत्या. दरवर्षी विद्यार्थी संख्येत फार बदल होत नाही. मागील वर्षाचा ट्रेंड लक्षात घेता यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीला हमखास प्रवेश मिळेल, असा विश्वास औरंगाबादचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) डॉ. बी. बी.चव्हाण यांनी व्यक्त केला.

प्रवेशाची अडचण येणार नाही:
शासनाच्या मागेल त्याला शाळा या धोरणामुळे अकरावीचे वर्ग वाढले आहेत. यामुळे अकरावीला जागांचा प्रश्न येत नाही. यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी जागांची अडचण येणार नाही. प्रत्येकाला प्रवेश मिळेल. – डॉ. बी. बी.चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: All SSC students will get 11th class admission passed during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x