7 May 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार? Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग
x

त्या २५ टक्क्यांमध्ये गरिबांचा विचारच नाही | खासगी रुग्णालयांत लस पूर्वीप्रमाणेच महाग | काय आहेत दर?

Vaccination

नवी दिल्ली, ११ जून | १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी केंद्र सरकारने लस खरेदी सुरू केली आहे. शिवाय, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी केंद्र सरकार प्रतिडोस १५० रुपये दराने खरेदी करेल. हेच दर राज्यांसाठी कोविशील्ड प्रतिडोस ३०० आणि कोव्हॅक्सिन ४०० रुपये असे होते. केंद्राने राज्यांच्या वाट्याची २५ टक्के खरेदी स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही खरेदी राज्यांनीच करावयाची होती.

केंद्राने १८ ते ४४ वयोगटासाठी पहिल्या टप्प्यात ४४ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. यात स्पष्ट करण्यात आले आहे की, सीरम आणि भारत बायोटेककडून जुन्या दरानेच खरेदी केली जाईल. परंतु, कंपन्यांना राज्यांसाठी निश्चित केलेल्या दरानेच केंद्राने लस खरेदी करावी असे वाटते. परंतु, केंद्राने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला आहे. कंपन्यांनी लसीचा हा पुरवठा ठरलेल्या वेळी करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

खासगी रुग्णालयांत पूर्वीप्रमाणेच लस असेल महाग:
खासगी रुग्णालयांत कोविशील्ड ६०० रु. आणि कोव्हॅक्सिन १,२०० रु. प्रतिडोस या दरानेच मिळेल. रुग्णालये १५० रुपये सेवाशुल्क घेऊ शकतील. म्हणजेच जीएसटीसह कोविशील्ड ७८० रु आणि कोव्हॅक्सिन १,४१० रु. प्रतिडोस मिळेल.

 

News Summary: The central government has started purchasing vaccines for people between the ages of 18 and 44. In addition, both Covishield and Covacin vaccines will be purchased by the central government at a rate of Rs 150 per dose. The same rates were Rs 300 for Covishield per dose and Rs 400 for Covacin. The Center has decided to procure 25 per cent of the share of the states itself. Earlier, the purchase was to be made by the states.

News Title: Corona vaccine rates charged in private hospitals are not affordable for poor peoples in India news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x